
ताप, खोकला आणि शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सोमवारी मुंबई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली. फडणवीसांशी बोलताना अण्णांचा चेहरा खुलला होता. त्यांनी फडणवीसांचा हात हाती घेतला. ‘अण्णा, शतायुषी व्हा…’ अशी सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
























































