
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्च 2026 च्या गट ‘ब’ च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून राज्यात सातव्या क्रमांकावर आलेल्या नंदुरबारच्या ऋतुजा पाटील हिला अखेर बेड्या पडल्या. राज्य शासनाचा आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळविणाऱ्या वडिलांच्या आशीर्वादाने एमपीएससी परीक्षेचा प्रश्नसंच मिळवून ऋतुजा औषध निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली होती.
एमपीएससीने तयार केलेल्या प्रश्नसंचातील शेकडो प्रश्न घेऊन तो प्रश्नसंच ऋतुजा पाटील हिला देण्यात आला होता. ऋतुजाचे वडील व राज्य शासनाचा आदर्श पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक अमृत पाटील यांना कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी आणून दिला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने एमपीएससीचे तीन अधिकारी, अमृत पाटील, प्रवीण पाटील तसेच ऋतुजाचा माजी प्रियकर गौरव पाटील यांना अटक केली होती.
























































