दहीहंडी उत्सवाला गालबोट, ऐरोलीत मानवी मनोरा कोसळून ३४ वर्षीय गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहीहंडी उत्सवाच्या उत्साहाला गालबोट लावणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना ऐरोलीमध्ये घडली आहे. ऐरोलीतील देविदास चौगुले दहीहंडी मंडळात मानवी मनोरा रचताना तो अचानक कोसळल्याने एका गोविंदाचा मृत्यू झाला. स्वप्नील नावर, असे मृत पावलेल्या गोविंदाचे नाव आहे. या घटनेमुळे घणसोली गाव परिसरासह दहीहंडी मंडळांवर मोठी शोककळा पसरली आहे.