मल्ल्या म्हणतो, मी कॉक्रोच होतो; माझ्यावर ब्रिटन सोडण्यास बंदी, हिंदुस्थानात कसा येऊ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातून पलायन करून लंडनमध्ये आश्रयास असलेला उद्योजक विजय मल्ल्याने त्याच्यावर अन्याय होत असल्याचा दावा केला. तसेच ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे हिंदुस्थानात येऊ शकत नसल्याचा कांगावादेखील माल्याने केला आहे.

मल्ल्याने ‘एक्स’वर अनेक पोस्ट टाकल्या. त्यात त्याने कॉक्रोच जनता पार्टीचा उल्लेख करत आपल्यावर अन्याय होत असल्याचा दावा केला. कदाचित मी आता कॉक्रोच बनायला हवे. कॉक्रोच बनून चांगले आयुष्य जगता येईल. ब्रिटनमधील कायदेशीर प्रक्रियेमुळे मला हिंदुस्थानात परत येण्यापासून रोखले आहे. वर्ष 2021 पर्यंत माझ्याकडून 14 हजार कोटी रुपये वसूल केल्याचे स्वतः ईडीनेच मान्य केले आहे. त्यानंतरही असे दाखविण्यात येत आहे की, मी बँकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे धोकेबाज म्हणणे कितपत योग्य आहे, असा कांगावा मल्ल्याने केला आहे.