असं झालं तर… सलग तीन महिने SIP चे पैसे भरले नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर सलग तीन महिने तुमच्या खात्यातून पैसे वजा झाले नाहीत, तर म्युच्युअल फंड कंपनी तुमची ती SIP स्वयंचलितपणे बंद (Cancel) करते.

सेबीच्या नियमांनुसार, सलग 3 ते 4 हप्ते फेल झाल्यास म्युच्युअल फंड कंपनी (AMC) तुमची एसआयपी बंद करू शकते. म्युच्युअल फंड कंपन्या कोणताही दंड आकारत नाहीत.

तुमचे आधी जमा झालेले पैसे तसेच सुरक्षित राहतात आणि त्यावर मार्केटनुसार परतावा मिळत राहतो. तुम्ही कधीही नवीन SIP सुरू करू शकता.

एसआयपी रद्द झाल्यामुळे भविष्यातील ऑटो-डेबिट थांबते आणि नवीन युनिट्स खरेदी होत नाहीत. ‘पॉज’ (SIP Pause) करणे हा एक चांगला पर्याय आहे.

तुम्ही SIP थांबवली तरी जोपर्यंत तुम्ही रिडेम्प्शनची विनंती करत नाही, तोपर्यंत तुमची गुंतवणूक सक्रिय राहते, त्यानंतर रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते.