ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढणार नाहीत! दोन जागांवर उमेदवार जाहीर 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली आहे. नंदिग्राममधून संचिता प्रधान (डे) आणि रेजीनगरमधून रबिउल आलम चौधरी यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना भवानीपूर मतदारसंघातून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतरही त्या जोमाने मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे पोटनिवडणूक लढून त्या पुन्हा विधानसभेत प्रवेश करतील, अशी चर्चा होती. या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला.