
हेअर कलर दीर्घकाळ टिकावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर केसांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते.
हेअर कलर केल्यानंतर किमान पुढील 72 तास शॅम्पूचा वापर करू नका.
असे केल्याने हेअर क्युटिकलला हेअर कलर लॉक करण्यास वेळ मिळतो. त्यामुळे केसांवरील हेअर कलर दीर्घकाळ टिकतो.
वारंवार केसांना शॅम्पू करू नये. त्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल नाहीसे होते.
तसेच केसातील कलर मॉलेक्यूल कमी होतात.
एक-दोन दिवस शॅम्पू न केल्याने तुमचे केस जर तेलकट झाले असतील तर केसांना ड्राय शॅम्पू वापरा.



























































