पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणरायाच्या आगमन आणि विसर्जनासाठी महापालिकेची तयारी सुरू झाली आहे. पर्यावरणपूरक उत्सवाची संकल्पना राबवताना पालिकेने श्रीगणेशोत्सव माहिती पुस्तिकेची निर्मिती केली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन महापौर रितू तावडे यांच्या हस्ते  महापौर दालनात बुधवारी झाले. या वेळी सभागृह नेते गणेश खणकर, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे तसेच अभिनेते प्रशांत दामले उपस्थित होते. या माहितीपुस्तिकेत नैसर्गिक तसेच कृत्रिम तलावांची माहिती, विविध नागरी सेवा-सुविधा, श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचा प्रवेश अर्ज आदींसह सार्वजनिक मंडळांसाठी आवश्यक माहितीचा समावेश आहे.