टीव्ही अभिनेत्रीला नवले पुलाजवळ अडवून अरेरावी, दोघांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्याशी शहरातील नवले पुलाजवळ किरकोळ अपघाताच्या वादातून दोघांनी अरेरावी करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध नऱहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री मुंबईहून साताऱयाला जात असताना कल्याणी यांच्या गाडीला संबंधितांच्या गाडीची किरकोळ धडक झाली. त्यानंतर दोघांनी कल्याणी यांची गाडी अडवून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर संबंधितांनी त्यांचा हात ओढून जबरदस्तीने आपल्या गाडीत घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या कल्याणी यांनी प्रतिकार केला. त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती कल्याणी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून दिली.