
बस अपघाताचे वार्तांकन करताना वृत्तवाहिनीचे हेलिकाॅप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये ही घटना घडली. सॅन फर्नांडो व्हॅली भागात एसयूव्ही आणि सिटी बसची धडक झाली. यात दोन ठार तर सहा जण जखमी झाले. या अपघाताचे थेट प्रक्षेपण आणि वार्तांकन करत असतानाच हे हेलिकाॅप्टर पार्किंग लॉटमध्ये कोसळले. यात चार वाहने, दोन स्टोरेज पंटेनर्सचे नुकसान झाले.






























































