कबड्डीच्या मैदानावर महाराष्ट्राचा पंचनाद, आरती बारी यांची आशियाई स्पर्धेसाठी निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेळाडू पदकासाठी झुंजतात आणि पंच त्या झुंजीला न्याय देतात. अशाच कठोर आंतरराष्ट्रीय अनुभवाच्या जोरावर अखिल हिंदुस्थानी कबड्डी महासंघाच्या पंच मंडळाच्या सदस्या आरती बारी यांची जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच म्हणून निवड झाली आहे.

येत्या 19 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2026 दरम्यान होणाऱया या प्रतिष्ठsच्या स्पर्धेत पंच म्हणून जबाबदारी मिळविणाऱ्या आरती बारी यांनी आजवर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंचगिरी केली आहे. 2016 विश्वचषक (अहमदाबाद), 2017 आशियाई अजिंक्यपद स्पर्धा (इराण), 2018 जकार्ता एशियन गेम्स, 2018 दुबई कबड्डी मास्टर्स, 2024 मेलबर्न रेड आणि 2026 महिला विश्वचषक (ढाका) अशा महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये त्यांनी पंच म्हणून काम केले आहे. 40पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि सहा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव तसेच प्रो-कबड्डी लीगच्या सिझन 2 ते 12पर्यंत पंच म्हणून केलेले योगदान त्यांच्या कारकिर्दीची उंची अधोरेखित करते.