तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत आज आयोगाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election-commission-to-issue-interim-order-on-tmc-party-symbol-rival-factions-stake-claim-ahead-of-nandigram-by-election

तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडून गुरुवारी अंतरिम आदेश दिला जाऊ शकतो. पश्चिम बंगालमध्ये नंदीग्राम आणि रेजीनगर या विधानसभा मतदारसंघात 6 ऑक्टोबरला पोटनिवडणुकीचे मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर निवडणूक आयोगाने गुरुवारी दोन्ही गटांना बैठकीसाठी बोलावले आहे. नंदीग्राम आणि रेजीनगर येथे तृणमूलच्या दोन्ही गटांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. दोन्ही गटांनी तृणमूल काँग्रेसच्या ठगवतावर दोन फुलेठ या चिन्हावर दावा केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग या चिन्हाबाबत काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.