25 हजार पगार असणाऱ्यांनाही पीएफ आणि पेन्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसंदर्भात (ईपीएफ) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीएफ आणि पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी वेतन मर्यादा दरमहा 15 हजार रुपयांवरून 25 हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला. याचा लाभ 51 लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना होणार आहे.

यापूर्वी सप्टेंबर 2014मध्ये वेतन मर्यादेत बदल करण्यात आला होता. आता नव्या वेतन मर्यादेनुसार, मूळ वेतन आणि महागाई भत्ता मिळून 25 हजारांपर्यंत ज्यांचे वेतन आहे, त्यांना लाभ मिळेल.

कोटय़वधी कर्मचाऱ्यांना लाभ

सध्या ईपीएफओचे 7.89 कोटी सदस्य आहेत. नव्या नियमानुसार आणखी 51 लाखांपेक्षा जास्त सदस्य जोडले जाऊ शकतात. योगदान देणाऱया 7.68 लाख कंपन्या आणि संस्था असून 82 लाख पेन्शनधारक आहेत.