संजय राऊत यांचे नवीन पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला, सोशल मीडियावर मुखपृष्ठाची झलक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक गाजल्यानंतर आता आणखी एक नवीन पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीस येणार आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे हे पुस्तक प्रकाशित केले जाणार असून, संजय राऊत यांनी X वर या पुस्तकाच्या नावाचा आणि मुखपृष्ठाचा फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे.

या पुस्तकाचे नाव ‘बोध कीर्तन’ असे असून, हे एक अनोखे पुस्तक असणार असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे लवकरच प्रकाशित होणाऱ्या माझ्या पुस्तकाची छोटीशी झलक! एक अनोखे पुस्तक!” असे म्हणत त्यांनी या आगामी पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण केली आहे. या पुस्तकाच्या कव्हरवर तंबोरा आणि आकर्षक अक्षरांमध्ये पुस्तकाचे नाव डिझाइन केलेले दिसत आहे. राजकारणासोबतच त्यांच्या या नवीन पुस्तकाविषयी राजकीय वर्तुळात आणि वाचकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान, संजय राऊत यांची याआधी एक वचनी, सच्चाई, युगान्त आणि नरकातला स्वर्गअशी पुस्तके प्रकाशित झाली आहे. ज्याला वाचकांची चांगलीच पसंती मिळाली होती.