
महाराष्ट्रात राहणाऱया प्रत्येकाला सुरक्षित व आरोग्यदायी अन्न मिळालेच पाहिजे अशा कायद्याची अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. या कायद्याचे पालन न करणाऱया नायर रुग्णालयाच्या कॅण्टीनसह मुंबईतील 7 आस्थापनांचे अन्न परवाने आज एफडीएने निलंबित केले.
एफडीएने नायर रुग्णालयातील कॅण्टीनवर धाड घातली तेव्हा तिथे अन्न सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळले. त्यामुळे कारवाई करण्यात आली. नायरसह कुलाबा येथील प्रसिद्ध ‘ऑलिम्पिया कॉफी हाऊस’, चेंबूरच्या पेस्तम सागर मार्गावरील ब्लिंकीट, घाटकोपर पश्चिम जे. व्ही. रोडवरील विश्वास स्वीट्स अॅन्ड स्नॅक्स, घाटकोपर पश्चिम येथील ए-1 ड्रायफ्रूट्स, वरळी महिंद्रा टॉवरसमोरील मिलन पंजाब हॉटेल, मालाड पूर्व येथील सद्गुरू स्वीट्सचे परवाने रद्द करण्यात आले.


























































