मध्य प्रदेशात नळखेडामध्ये नाल्यात भाविकांची कार वाहून गेली; ८ जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातील नळखेडा येथे एक भीषण अपघात झाला आहे. माँ बगलामुखी मंदिराजवळ मुसळधार पावसानंतर भाविकांना घेऊन जाणारी एक कार पाण्याने भरलेल्या नाल्यात वाहून गेली. या अपघातात कारमधील आठ जणांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये ३ मुले, २ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. हे भाविक नळखेडा येथे दर्शनासाठी आले होते.