
महाराष्ट्रातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर पदवीधर तर अमरावती, पुणे शिक्षक मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होईल. सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजीत वंजारी, किरण सरनाईक, जयंत आसगावकर यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होत आहे.






























































