नियम डावलून विसर्जन, नियम डावलून विसर्जन करणाऱ्या चौघांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उच्च न्यायालयाचे निर्देश आणि मीरा-भाईंदर महापालिकेच्या आदेशांना धाब्यावर बसवत ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावाऐवजी जेसलपार्क खाडीच्या पात्रात विसर्जन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवन मांझी आणि त्याच्यासोबत असलेल्या ३ अनोळखी व्यक्तींविरोधात नवघर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे.