ठाण्यात पहिली प्रीपेड ऑटोरिक्षा सेवा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे रेल्वे स्थानकातून शहराच्या विविध भागांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि पारदर्शक व्हावा यासाठी बहुप्रतिक्षित ‘प्रीपेड ऑटोरिक्षा सेवा’ सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यात रेल्वे स्थानकावरून अशा स्वरूपाची अत्याधुनिक प्रीपेड सुविधा सुरू होणारा हा पहिलाच उपक्रम आहे.

प्रीपेड रिक्षा सेवेचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन सिटी फ्लो आणि आर निसर्ग फाउंडेशन यांच्या सहकार्याने केले जाणार आहे. यामुळे प्रवाशांना स्टेशनवरून विनाविलंब रिक्षा उपलब्ध होणार असून प्रवासापूर्वीच निश्चित भाड्याची अचूक माहिती मिळणार आहे. परिणामी भाडेवाढ, भाडे नाकारणे किंवा भाड्याबाबत होणारी अनिश्चितता पूर्णपणे दूर होऊन डिजिटल व ऑनलाइन व्यवहारांना मोठा हातभार लागणार आहे।