
दिल्लीतील कालकाजी मंदिराजवळील ‘आस्था कुंज पार्क’मध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. आज सकाळी झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी आसिफ या एका आरोपीला अटक केली. आरोपीने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी एका हेड कॉन्स्टेबलच्या बुलेटप्रूफ जॅकेटला लागली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी आरोपीच्या पायावर गोळी झाडली. जखमी आरोपीला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.


























































