
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या दोन सल्लागारांना कतारकडून लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. जोनाथन उरिच आणि एली फेल्डस्टीन अशी या दोघांची नावे आहेत. जागतिक मुत्सद्देगिरीत कतारची प्रतिमा उजळवण्यासाठी या दोघांनी लाच घेतल्याचा आरोप आहे. तसेच या दोन अधिकाऱ्यांनी अतिगोपनीय माहिती सुद्धा लीक केली. कतारने सर्व आरोप फेटाळले आहेत, तर नेतान्याहू यांनी हे प्रकरण राजकीय मोहीम असल्याचे म्हटले.




























































