वेटलिफ्टिंगमधील पदकाचा दुष्काळ संपला, मीराबाई चानूने 28 वर्षांनंतर जिंकले रौप्यपदक 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी वेटलिफ्टिंगला तब्बल 28 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळाले आणि या ऐतिहासिक कामगिरीवर मीराबाई चानूने रौप्यपदकाची मोहोर उमटवली. महिलांच्या 49 किलो गटात एकूण 198 किलो वजन उचलत मीराबाईने रुपेरी यश संपादन केले.

1998 मध्ये कर्णम मल्लेश्वरीने रौप्यपदक जिंकल्यानंतर हिंदुस्थानला वेटलिफ्टिंगमध्ये आशियाई पदकासाठी तब्बल 28 वर्षे वाट पाहावी लागली हे विशेष. मीराबाईने स्नॅचमध्ये 87 किलो, तर क्लीन अॅण्ड जर्कमध्ये 111 किलो वजन उचलत एकूण 198 किलोची नोंद केली. 32 वर्षीय मीराबाईचे आशियाई स्पर्धेतील हे पहिलेच पदक ठरले. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धांमध्ये पदके जिंकलेल्या मीराबाईने आता आशियाई स्पर्धेच्या पदक यादीतही आपले नाव कोरले.