
गणेशोत्सव देशभरात साजरा केला जात असून राजधानी दिल्लीत समरसता श्री गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना मानाचे स्थान देऊन एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. देहविक्री करणाऱ्या भगिनींच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली तर या भगिनींचे पूजन करून त्यांना सन्मानितही करण्यात आले.
मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध भंते, दलित, तृतीयपंथी, दिव्यांग, बालगृहातील अनाथ मुले, समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेले नक्षलवादी, चकमा समुदाय, ईशान्य भारतातील विविध वसतिगृहांमध्ये शिकणारे विद्यार्थी तसेच वेद पाठशाळेतील बटू-विद्यार्थी समरसता श्री गणेशोत्सवात उपस्थित राहून बाप्पाची पूजा व आरती करणार आहेत. ‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनील देवधर हे गेल्या पाच वर्षांपासून समरसता श्री गणेशोत्सवाचे आयोजन करत आहेत.


























































