
घराघरात चैतन्य पसरवून, सुख, शांती व समृद्धीचा आशीर्वाद देऊन लाडका बाप्पा आपल्या गावी निघाला आहे. उद्या, अनंत चतुर्दशीला लालबाग, परळ, गिरगावातील मानाच्या गणपतींसह अनेक सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे. लाखो गणेशभक्त सहभागी झालेल्या विसर्जन मिरवणुका मुंबईच्या रस्त्यारस्त्यांवर निघणार आहेत. अलोट गर्दीवर नियंत्रण ठेवत गणेशोत्सवाची निर्विघ्नपणे सांगता करण्यासाठी पोलीस दल आणि पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. अवघ्या मुंबईनगरीत भक्तीचा महासागर लोटणार आहे. पुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची विशेष खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. सूचनांचे पालन करा, शिस्त पाळा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
तमाम गणेशभक्तांसाठी उद्याचा दिवस जितका उत्साहाचा तितकाच भावुक करणार आहे. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी लाखो गणेशभक्तांची पावले चौपाटय़ा आणि पृत्रिम तलावांकडे वळणार आहेत. त्यांच्या दिमतीला पालिकेची संपूर्ण यंत्रणा, पोलीस दल, रेल्वे प्रशासन तयार आहे. महापालिकेतर्फे विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गिरगाव, दादर, जुहूसह अन्य चौपाटय़ा, नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच मुंबईतील 383 हून अधिक पृत्रिम तलावांमध्ये गणरायांचे विसर्जन होणार आहे. या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी, स्वयंसेवक यांची फौज तैनात केली जाईल.
वरुणराजाही हजेरी लावणार
लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी उद्या मुंबईत वरुणराजाचीही हजेरी राहणार आहे. मुंबईच्या अनेक भागांत हलक्या आणि मध्यम सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गिरगाव चौपाटीवर विशेष व्यवस्था
स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे 12 कृत्रिम तलाव, 20 निरीक्षण मनोरे, 22 तराफे, 90 प्रसाधनगृहे आणि 2,000 मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. तसेच एक प्राथमिक आरोग्य पेंद्र, तीन रुग्णवाहिका, 548 फ्लडलाईट आणि 11 सर्चलाईटची व्यवस्था, समन्वय कक्ष, पार्ंकग व्यवस्था आहे.
गिरगाव चौपाटी परिसरात व्यापक स्वरूपात आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षात महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, बेस्ट, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यांचे अधिकारी तसेच अनिरुद्ध अपॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांचे हॅम चालक समन्वययाकरिता उपस्थित राहणार आहेत.
































































