
मुख्य निवडणूक ज्ञानेश कुमारांनी मला भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढण्याची व मंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केरळचे माजी मुख्य सचिव जीजी थॉम्सन यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ‘2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी ज्ञानेश कुमार यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. ते तेव्हा केंद्रीय गृहखात्याचे सहसचिव म्हणून कार्यरत होते. त्यांनी मला भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास सुचवले होते. जिंकून आल्यास मंत्रिपद मिळू शकते असेही त्यांनी सांगितल्याचा दावा थॉम्सन यांनी केला आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
हे तर मोदी–शहांचे अम्पायर – राहुल गांधी
थॉम्सन यांच्या दाव्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमारांवर तोफ डागली. ‘आयएएस अधिकारी असताना हे भाजपसाठी भरती करत होते. नंतर, मोदी-शहांनी त्यांना देशातील निवडणुकांच्या फिक्सिंगची जबाबदारी देऊन अम्पायर नेमले,’ असा टोला राहुल यांनी हाणला.
2 ऑक्टोबरपासून सीजेपीचे देशव्यापी आंदोलन
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे. ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा न दिल्यास 2 ऑक्टोबरच्या गांधी जयंतीपासून देशव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा सीजेपीचे संयोजक अभिजीत दीपके यांनी दिला आहे.

























































