
महात्मा फुले जन्म द्विशताब्दीनिमित्ताने राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने ‘फुले फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. हा फेस्टिव्हल 27 ते 29 नोव्हेंबर रोजी गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे होणार आहे. स्वातंत्र्य, समता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात महात्मा फुले यांनी क्रांतिकारी आणि दूरगामी कार्य केले. त्याचा नव्या संदर्भात विचार व्हावा यासाठी फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. फेस्टिव्हलमध्ये विविध प्रदर्शने तसेच विविध चळवळी, साहित्य प्रकाशने आणि परिवर्तनवादी उपक्रम यांची दालने असतील. तिथे भेटीगाठी, चर्चा, नाटक, गाणी, कविता, संगीत, असे कार्यक्रम होतील. जेन झी, जेन अल्फा याच्यासाठीही मुक्त मंच असतील, अशी माहिती राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांनी दिली.























































