माझा लढा सुरूच राहणार – विद्यानंद बापट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रचंड दणदणात झाला. त्यामुळे लोक हैराण झाले होते. ध्वनिप्रदूषणात कोणतीही कमतरता जाणवली नाही. मध्यवर्ती नारायण पेठेत सर्वाधिक ध्वनिप्रदूषण कळसाला पोहोचले होते. माझ्या आंदोलनाचे यश आले नाही, प्रामुख्याने काही मंडळांनी माझे आर्टिफिशल इंटेलिजन्स व्हिडीओ बनवून, मी बोललेले दाखवून नाचवत होते. ३६५ दिवस शांतता हवी असून, त्यासाठी माझा लढा सुरूच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया ध्वनिप्रदूषणविरोधात लढणारे विद्यानंद बापट यांनी दिली आहे.

मी राहत असलेल्या परिसरातून गणेश विसर्जन मिरवणुका गेल्या. घराखालून मिरवणुका जात असताना सर्वाधिक ध्वनिप्रदूषण करण्यात आले. ध्वनिप्रदूषण कळसाला पोहोचले ते नारायण पेठेत, माझ्या ध्वनिप्रदूषणविरुद्ध आंदोलनाचे यश आले नाही. मी नास्तिक असून, देवभोळ्यांच्या भावना दुखवतो, नागरिकांचे आरोग्य जपवण्यासाठी मी भावना दुखावतच राहणार, असल्याचेही विद्यानंद बापट यांनी सांगितले.

डीजे वादनाविरूद्ध पोलिसांनी ऑन द स्पॉट कारवाई करायला पाहिजे होती. डेसिबलविरुद्ध कारवाईची इच्छा होती, तर का केली नाही. ती पुढे काही दिवसांत करावी, अशीही मागणी बापट यांनी केली.