
प्राची चौधरीने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ऍथलेटिक्स ट्रकवर 400 मीटरमध्ये कांस्यपदकावर नाव कोरले. प्राचीने अंतिम फेरीत 53.21 सेकंदांची वेळ नोंदवली. वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीच्या जवळपास पोहोचत तिने हिंदुस्थानच्या पदकतालिकेत आणखी एका कांस्याची भर घातली.























































