विनोद कांबळीवर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ, वांद्रे येथे आठ कोटींचा फ्लॅट असूनही घराबाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा माजी फलंदाज विनोद कांबळीवर अखेर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे. ठाण्यातील निदान या वृद्धाश्रमामध्ये तो वास्तव्यास असल्याचे आता समोर आले आहे. विनोदने काही तासांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता आणि त्यानंतर चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पण वांद्रे येथे आठ कोटींचे घर असताना त्याच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ का आली, हा प्रश्न अजुनही अनुत्तरित आहे.

विनोद बऱयाच दिवसांपासून आजारी आहे. काही दिवसांपूर्वी त्याला चालता येत नसल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर त्याची प्रकृती सुधारली होती. पण आता त्याची रवानगी वृद्धाश्रमात झाल्याचे समोर आले आहे.

विनोद नेमकं काय म्हणाला…

निदान वृद्धाश्रमात कर्मचाऱयांकडून माझी चांगली काळजी घेतली जात आहे. इथल्या सोयीसुविधा दर्जेदार आहेत. मला येथील कर्मचाऱ्यांकडून प्रेम, सन्मान आणि आपुलकी मिळत आहे. त्यामुळे येथे मला माझ्या घरासारखेच वाटते, असे विनोदने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.