
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठाराच्या ‘लक्झुरिअस टुरिझम’साठी 25 सुपर कार्सचा ताफा साताऱयात दाखल झाला आहे. ‘द सुपर कार रुट ग्रुप’ने या कार रॅलीचे आयोजन केले आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ झाला.
खासदार उदयनराजे भोसले यांना सुपर फास्ट कारचे वेड आहे. फॉर्म्युला वन सुपर रेसिंग कार कॉम्पिटिशनमध्येही त्यांची निवड झाली होती. हा धागा पकडून मुंबईहून थेट खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी 25 सुपर कार्स आज उदयनराजे यांच्या जल मंदिर या निवासस्थानी दाखल झाल्या. उदयनराजे यांनी सुपर कार्स ओनरसोबत गप्पादेखील मारल्या.
ही कार रॅली म्हणजे एक प्रकारे कास पर्यटनाचा प्रमोशनचा भाग आहे. या संपूर्ण मित्रमंडळींबद्दल आणि त्यांच्या गाडय़ांबद्दल मी ऐकले होते. मी कॉलेजच्या दिवसात गेलो की काय असे थोडय़ा वेळासाठी मला वाटले, अशी मिश्कील टिप्पणी उदयनराजे यांनी यावेळी केली.




























































