
सांताक्रुझमध्ये गटार साफ करण्यासाठी महापालिकेच्या चेंबरमध्ये उतरलेल्या एका कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. सांताक्रुझमधील व्ही एन देसाई रुग्णालयासमोर रोड नंबर 8 वर ही घटना घडली. जखमीला उपचारासाठी व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत कामगाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. संतोष गणपत काष्टे (47) असे मयताचे तर अजय ध्यानचंद ठाकूर (26) असे जखमीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकोला पोलीस स्टेशन हद्दीमधील व्ही एन देसाई रुग्णालय समोरील रोड नंबर 8 वरील एका सोसायटीची गटार लाईन ब्लॉक झाली होती. या गटर लाईनची सफाई करण्यासाठी सोसायटीने सोमवारी सकाळी खाजगी कामगारांना बोलावले होते. हे कामगार सोसायटीचे गटार साफ करता करता रोडवरील महापालिकेच्या चेंबरमध्ये उतरले. यावेळी संतोष काष्टे याचा मृत्यू झाला तर अजय ठाकूर जखमी झाला. मयत इसमाचे शवविच्छेदन करण्यात येत असून, त्या दृष्टीने गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
























































