
नरेंद्रला 90 किलोपेक्षा अधिक वजनी गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सेमी फायनलच्या तिसऱ्या फेरीत सर्व पंचांनी कझाकस्तानच्या आयबेक ओरलबेच्या बाजूने निकाल दिला, ज्यामुळे त्याला 5-0 असा विजय मिळाला. त्यामुळे नरेंद्रला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या पराभवानंतरही त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवले. या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमधील हिंदुस्थानचे हे पहिले पदक आहे.
























































