ट्रेंड – समजूतदार आई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका व्हिडीओमध्ये कुत्र्यांच्या पिलांनी एका मांजरीला आपली ‘आई’ समजून चांगलेच गोंधळात टाकले आहे. हे दृश्य बघताना फारच मजेशीर वाटते. छोटी पिल्ले मांजरीच्या अंगावर चढतात, तिचा चेहरा चाटतात, तिला बिलगत तिच्या मागे फिरताना दिसत आहेत; जणू काही त्यांना त्यांची नवीन आईच सापडली आहे. मांजर मात्र शांत दिसतेय. जसं काही तिने आईची भूमिका स्वीकारली असावी. एक पिल्लू तर तिची शेपटी ओढू लागते; तरीही ती शांतपणे उभी राहते. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सना त्या बिचाऱ्या मांजरीची अवस्था पाहून हसू येतेय. हा व्हिडिओ @nvu_india या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकजण गंमतीने म्हणतात की, ती चुकून पिल्लांची ‘आई’ बनली आहे आणि आता त्यांच्या प्रेमातून सुटता येणार नाही. एकजण म्हणतोय, ‘‘अरे, ही तुझी आई नाही, तर सिंहाची मावशी आहे.’’ तर अन्य एकाने ‘मातृत्वाची भावना सर्वत्र सारखीच असते.’ अशा कमेंट्स येत आहेत.