Chandrapur News दुचाकीला रानडुक्कर धडकल्याने दोन मित्रांचा मृत्यू, एक गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर शहरानजीकच्या बिनबा गेट परिसरात दुचाकीला रानडुक्कर धडकल्याने झालेल्या ब अपघातात दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रोहित मनोज शिंदे (२८) आणि मयंक अनुप शर्मा (३०, रा. दोघेही बालाजी वॉर्ड, चंद्रपूर) अशी मृत तरुणांची नावे आहेत. साहिल महादेव बुरडकर (२०) हा गंभीर जखमी झाला आहे. हे तिघे रात्रीच्या सुमारास दुचाकीने चंद्रपूरकडे परत येत होते. शांतीधाम जवळ दुचाकीसमोर एक डुक्कर रस्त्यावर आडवे आले. दुचाकीची डुक्कराला जोरदार धडक बसल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तिघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर जखमी साहिल बुरडकर याल खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.