
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 10 ऑक्टोबर 2026पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. किमान पात्रता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. सीडीओईमार्फत बीए, बीकॉम, बीकॉम (अकाऊंट्स अँड फायनान्स), बीएस्सी (आयटी), बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स), एमए, एमकॉम, एमएस्सी, एमएमएस, एमसीए, पीजीडीएफएम आणि डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट (डीएसएम) आदी अभ्यासक्रम चालविले जातात. प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीचा पर्यायही उपलब्ध आहे. एमएमएस आणि एमसीएच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी सीडीओईच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.





























































