दिवाळी आणि छठ उत्सवासाठी मध्य रेल्वेच्या 162 अतिरिक्त गाडय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी विविध ठिकाणांसाठी 162 अतिरिक्त विशेष गाडय़ांची घोषणा केली आहे. त्यामुळे उत्सव विशेष गाडय़ांची एकूण संख्या 580 झाली आहे. मुंबईतून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून विशेष गाडय़ा सुटणार आहेत. दिवाळी तसेच त्यापाठोपाठ येणाऱया इतर सणांच्या सुट्टीत मोठय़ा प्रमाणावर लोक फिरण्यासाठी बाहेर पडतात. या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाडय़ांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बुधवारी जाहीर केलेल्या अतिरिक्त विशेष गाडय़ांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर साप्ताहिक वातानुकूलित, लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर, लोकमान्य टिळक टर्मिनस-संतरागाछी साप्ताहिक वातानुकूलित सुपरफास्ट, लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस साप्ताहिक विशेष गाडय़ांचा समावेश आहे.