IND Vs WI – तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज संघातून बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. आतापर्यंत दोन सामने झाले आणि दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकले असून मालिका सुद्धा खिशात घातली आहे. हाच जोश काय ठेवत टीम इंडिया तिसऱ्या सामन्यातही वेस्ट इंडिजला लोळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. मात्र, या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा संघातून बाहेर झाला आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यात प्रसिद्ध कृष्णा हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे त्रस्त झाला होता, ज्यामुळे त्याला केवळ पाच षटकेच गोलंदाजी करता आली. या दुखापतीमुळे तो आगामी सामन्यांमधून बाहेर पडला असून, त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली आहे. अंशुल कंबोजची निवड अनपेक्षित होती, कारण तो सध्या पुडुचेरी येथे ऑस्ट्रेलिया-ए विरुद्ध सुरू असलेला अनिधिकृत कसोटी सामन्याध्ये खेळत होता. त्याने पहिल्या डावात तीन विकेट घेतल्या आणि दुसऱ्या डावातही महत्वपूर्ण दोन षटके टाकली. मात्र, टीम इंडियाच्या मुख्य संघातून बोलावण आल्यामुळे तो मैदानात बाहेर पडला आणि त्याची जागा प्रफुळ हिंगेने घेतली.

कंबोजकडे प्रचंड वेग नसला तरी अचूक लाईन-लेन्थ आणि डेथ ओव्हर्समधील अचूक यॉर्कर टाकण्याची त्याची क्षमता कौतुकास्पद ठरली आहे. आयपीएल 2026 मधील त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे आणि गोलंदाजीतील विविधतेमुळेच त्याला संघात संधी देण्यात आली आहे. दरम्यान, हिंदुस्थान आणि वेस्टइंडीज यांच्यातील मालिकेचा तिसरा व अंतिम सामना 3 ऑक्टोबर रोजी न्यू चंदीगड (मुल्लांपुर) येथे खेळवला जाणार आहे.