
रायगड जिल्ह्यातील दिवेआगार समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पुण्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेले आठ जण समुद्राच्या खोल पाण्यात बुडाले. आठही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे फिरण्यासाठी आली होती. किनाऱ्यावर मौजमजा करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे आठही जण समुद्राच्या पाण्यात ओढले गेले. ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बुडलेल्या आठही जणांना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, आठही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

























































