
राजकीय वर्तुळात शुक्रवारी एक लक्षवेधी दृश्य दिसले. संसद भवनात महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय जमले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी एकत्र दिसले.
महात्मा गांधींना आदरांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना भेटत हात जोडले आणि खरगे यांच्याशी संवादही साधला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील राजकीय हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही भेटीने लक्ष वेधले आहे.
महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी एकत्र दिसले. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सभापती ओम बिरला, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते. सर्व नेत्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली.



























































