
पाठदुखी नवीन असल्यास पहिल्या 48 तासांत बर्फाने शेका. जुनी किंवा सतत होणारी पाठदुखी असल्यास गरम पाण्याच्या पिशवीने शेका यामुळे स्नायूंना आराम मिळतो.
मोहरीच्या तेलात लसणाच्या 4-5 पाकळ्या गरम करून त्या तेलाने पाठीची हलकी मालिश करा. लसणामध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात.
ऑफिसमध्ये किंवा घरी बसताना पाठ सरळ ठेवा. खुर्चीला पाठीमागे सपोर्ट नसेल तर लहान उशी किंवा रोल केलेला टॉवेल वापरा.


























































