
जीएसटी काऊन्सिलची 57 वी बैठक ही 7 ऑक्टोबरऐवजी 8 ऑक्टोबरला होणार आहे. काही आवश्यक कारणांमुळे या बैठकीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे काऊन्सिल सचिवालयाने सांगितले. वेळापत्रक बदलण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. यापूर्वी ही बैठक 12 सप्टेंबरला होणार होती, ब्रिक्स शिखर परिषदेमुळे ती पुढे ढकलून 7 ऑक्टोबरला निश्चित करण्यात आली होती.
हिंदुस्थानी तरुणावर पॅरिसमध्ये खटला
‘सीव्हीएलटी’ नावाचे निओ-नाझी आणि अतिरेकी ऑनलाईन नेटवर्क चालवल्याचा आणि अल्पवयीन मुलींना ऑनलाईन लैंगिक कृत्ये तसेच स्वतःला इजा करण्यास भाग पाडल्याप्रकरणी हिंदुस्थानी तरुणावर खटला दाखल केला आहे. रोहन राणे असे त्याचे नाव असून दोष सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तपासात राणेशी संबंधित 20 पीडितांची ओळख पटली आहे.
हिंदुस्थानी तरुणावर पॅरिसमध्ये खटला
नायजेरियात एका विमान अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. नायजेरिया वायुदलाचे एटीआर-42 या विमानात सात क्रू मेंबर्ससह एकूण 32 जण होते. हे विमान बेनिनहून लागोसला जात होते. बेनिन सिटीहून उड्डाण केल्यानंतर या विमानाचे एअर ट्रफिक पंट्रोलशी संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान इग्बोकोडामध्ये नौदल बेसजवळ दुर्घटनाग्रस्त झाले. विमानाचा सांगाडा मिळाला आहे.

























































