अशा वागणुकीमुळे युवा खेळाडूंचे करिअर धोक्यात! गौतम गंभीर आणि गिलवर दिग्गज क्रिकेटपटू भडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकतीच हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. ही मालिका टीम इंडियाने 2-1 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाने मालिका जिंकली असली तरी संघाच्या रणनीतीवर आणि निवड समितीच्या धोरणांवर टीम इंडियाच्या माजी खेळाडूने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यपद्धतीवरही त्याने संताप व्यक्त केला आहे.

टीम इंडियाचा माजी खेळेडू मोहम्मद कैफेन आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडीओ शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत वेगवान गोलंदाज आकिब नबीच पदार्पण झालं. मात्र, त्याची कामगिरी अत्यंत खराब राहिली. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आलं. मात्र, अशा वागणुकीमुळे नवीन खेळाडूंचा आत्मविश्वास पूर्णपणे खचतो आणि यामुळे युवा खेळाडूंचे करिअर धोक्यात येत असल्याच कैफ म्हणाल आहे. यासंदर्भात प्रश्व विचारला असता गौतम गंभीरने उत्तर दिलं होतं की, अशा अर्थहीन किंवा डेड रबर सामन्यांमधून खेळाडूंना योग्य अनुभव मिळत नाही. गौतम गंभीर याने दिलेला हा युक्तीवात मोहम्मद कैफला पटला नाही. तो म्हणाला की, जर एकाच सामन्यात खराब कामगिरीनंतर एखाद्या खेळाडूला असे बाहेर फेकले जाणार असेल तर, तो खेळाडू भविष्यात पुन्हा कधी व्हाइट-बॉल क्रिकेट खेळू शकेल का? NDTV ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

गौतम गंभीरचा दावा फेटाळून लावल्यानंतर मोहम्मद कैफने कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्ववार आणि निवड समितीच्या कार्यपद्धतीवरही टीका केली आहे. आगामी विश्वचषकाला फारसा वेळ उरलेला नसताना कर्णधार गिल अद्याप अननुभवी आणि धास्तावलेला असल्याचे जाणवत आहे, असे तो म्हणाला. तसेच, निवड समितीच्या भूमिकेवर ताशेरे ओढत त्याने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सातत्याने डावलण्यामागील कारणांवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. माजी खेळाडूंचा समावेश असलेल्या निवड समितीला शमीसारख्या अनुभवी गोलंदाजाशी योग्य तालमेळ साधता येत नसल्याबद्दल त्याने आश्चर्य व्यक्त केले.