राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात, ज्ञानेश कुमारांविरोधात आकाशवाणी भवन परिसरात 8 तास ठिय्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसआयआरवरून निवडणूक आयोगाविरोधात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या खासदार प्रियांका गांधी यांनी आकाशवाणी भवन परिसरात धरणे आंदोलन केले. जवळपास ९ तास त्यांनी आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या दिला. रात्री ८ वाजेच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काही वेळाने दिल्ली पोलिसांनी प्रियांका गांधी यांना सोडून दिले. मात्र, राहुल गांधी यांना बसमधून पोलीस घेऊन गेले. यावेळी मोठा गोंधळ उडाला.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह काही काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दुपारी १२.३० वाजेपासून आकाशवाणी परिसरात आंदोलनाला बसले होते. आकाशवाणी भवन हे निवडणूक आयोगाच्या अगदी जवळ आहे. निवडणूक आयुक्तांना भेटल्याशिवाय हटणार नाही, अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली होती.

१ नोव्हेंबरच्या सभेसाठी काँग्रेसची तयारी, रामलीला मैदान बुक

इंडिया आघाडीच्या १ नोव्हेंबरला होणाऱ्या सभेसाठी रामलीला मैदान बुक करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रपतींच्या भेटीसाठी ७-८ ऑक्टोबरला वेळ मागण्यात आली आहे. तसेच ९ ऑक्टोबरला भेट मिळाली तरीही चालणार आहे. राष्ट्रपतींना भेटणाऱ्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते म्हणजेच राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, शरद पवार, ओमर अब्दुल्ला, तेजस्वी यादव, डी. राजा यांचा समावेश आहे.