
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात मंगळवारी महामार्गावर पार्क केलेल्या ट्रेलरला कारने धडक दिली. या अपघातात सात जण ठार झाले. पोलिस अधीक्षक नितेश पांडे यांनी सांगितले की, सर्व मयत एका शिपयार्डमध्ये काम करत होते आणि भावनगरहून अलंगला जात होते. अपघातात कारचाही चक्काचूर झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तळाजा तालुक्यातील त्रापज गावाजवळ भावनगर-सोमनाथ राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी भावनगर येथील रुग्णालयात नेण्यात आले.

























































