दिल्ली-NCR सह उत्तर हिंदुस्थानात भूकंपाचे धक्के; उत्तराखंडमध्ये 4.9 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली-NCR सह उत्तर हिंदुस्थानातील अनेक भागांना मंगळवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. उत्तराखंडमधील सर्व जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असून, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणातही त्याची तीव्रता जाणवली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 10 वाजून 23 मिनिटांनी उत्तराखंडमधील उत्तरकाशी परिसरात रिश्टर स्केलवर 4.9 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील खडून लगा ग्वाली परिसरापासून सुमारे 22 किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात आले.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार भूकंपाचे धक्के दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि आसपासच्या परिसरातही जाणवले. अचानक जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. विविध भागांत भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घराबाहेर पडल्याची माहिती आहे.