आरबीआय आज रेपो रेट जाहीर करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाविषयक समितीची तीन दिवसांच्या बैठकीला सुरुवात झाली असून उद्या, 7 ऑक्टोबरला आरबीआय रेपो रेट जाहीर करणार आहे. पतधोरणविषयक समितीच्या बैठकीतसंदर्भात बहुतांश अर्थतज्ञांनी रेपो रेटमध्ये वाढ होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

आरबीआयने फेब्रुवारी 2025 नंतर रेपो रेटमध्ये कपात करण्याचे तर काही वेळा रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे धोरण राबवले आहे. परंतु आता महागाई वाढल्याने रेपो रेट वाढण्याची शक्यता आहे. आरबीआयने उद्या रेपो रेटमध्ये वाढ केल्यास त्याचा थेट परिणाम कर्जदारांवर होईल. बँका व्याजदरात वाढ करतील. त्यामुळे कर्जदारांना जास्तीचा ईएमआय भरावा लागेल. आरबीआयने फेब्रुवारी 2023 मध्ये 0.25 टक्के रेपो रेट वाढवला होता. 2023-24 मध्ये रेपो रेट कायम ठेवण्यात आला होता. फेब्रुवारी 2025 पासून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली. परंतु आता रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. काही तज्ञांच्या मते डिसेंबरमध्येही रेपो रेटमध्ये 0.25 टक्के वाढ केली जाऊ शकते.