नवरात्रोत्सवात अवघ्या 600 रुपयांत अंबाबाई देवीचे दर्शन, 40 महिलांच्या ग्रुपसाठी एसटी बसची विशेष सेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. नवरात्रोत्सवामध्ये श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी पिंपरी-चिंचवड एसटी आगार, पिंपरीने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अवघ्या 600 रुपयांच्या खर्चात महिलांना कोल्हापूर दर्शनासाठी विशेष बसने जाता येणार आहे. यासाठी किमान 40 महिलांचे ग्रुप बुकिंग करणे आवश्यक आहे.

नवरात्रोत्सवात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे महिलांना स्वतंत्रपणे प्रवासाचे नियोजन करण्याऐवजी ग्रुपने एसटी बस बुक करून कोल्हापूरला जाता येणार आहे. मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवस ही विशेष बस सोडण्यात येणार आहे. या प्रवासासाठी प्रत्येक महिलेकडून 600 रुपये आकारले जाणार आहे. हे पैसे केवळ एसटीचे भाडे असणार आहेत. कोल्हापुरात दर्शनादरम्यान लागणारा नाश्ता, जेवण किंवा इतर वैयक्तिक खर्च प्रवाशांनाच करावा लागणार आहे. इच्छुक महिलांनी ग्रुप बुकिंगसाठी वल्लभनगर आगाराशी संपर्क साधावा. साडेतीन शक्तिपीठ दर्शनासाठी स्वतंत्र बससेवेचे बुकिंग सुरू आहे, अशी माहिती वल्लभनगरच्या आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील यांनी दिली.