रशियाजवळ जहाजावर युव्रेनचा ड्रोन हल्ला, 23 हिंदुस्थानी थोडक्यात बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाजवळ असलेल्या ब्लॅक सी म्हणजेच काळ्या समुद्रात लायबेरियाचा ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजावर युव्रेनने हल्ला केला. या जहाजावर 23 हिंदुस्थानी क्रू सदस्य होते. हल्ल्यानंतर आपत्कालीन पथकांनी सर्वांची सुखरूप सुटका केली. या हल्ल्यानंतर जहाजाला लागलेल्या भीषण आगीत कच्चे तेल जळून खाक झाले.

हल्ल्यापूर्वी मरीनट्रफिकने जहाजाचे शेवटचे ठिकाण काळ्या समुद्रात रशिया-जॉर्जिया सीमेजवळ असल्याचे सांगितले होते. जहाजातून उठणाऱ्या प्रचंड आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट अनेक किलोमीटर दूरवरून दिसत होते. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे अग्निशमन दलाचे जवान जहाजाजवळ पोहोचू शकत नव्हते. हे जहाज युक्रेनच्या निर्बंधाच्या यादीत समाविष्ट होते.