असं झालं तर… पासपोर्ट रद्द झाल्यास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पासपोर्ट रद्द (Revoke/Cancel) झाल्यास परदेश प्रवास तत्काळ थांबतो आणि नवीन व्हिसा मिळणे बंद होते. रद्द झालेला पासपोर्ट प्राधिकरणाकडे तातडीने जमा करावा लागतो.

जर पासपोर्ट चुकीच्या कारणांमुळे किंवा गैरसमजातून रद्द झाला असेल तर तुम्ही संबंधित पासपोर्ट अधिकारी किंवा परराष्ट्र मंत्रालयाकडे (MEA) अपील करू शकता.

हिंदुस्थानी संविधानाच्या कलम 226 नुसार तुम्ही थेट न्यायालयात रिट याचिका दाखल करू शकता. साधारणपणे अपिलावर आठ आठवडय़ांत निर्णय दिला जातो.

मंजुरी मिळाल्यानंतरच पासपोर्टसाठी अर्ज करता येतो. पासपोर्ट प्राधिकरण/कनिष्ठ न्यायालयाने दिलेला रद्द करण्याचा आदेश चुकीचा असल्यास उच्च न्यायालय तो फेटाळू शकते.

जर वैद्यकीय किंवा व्यावसायिक तातडीची गरज असेल तर उच्च न्यायालय प्रवासाची परवानगी किंवा पासपोर्ट पुनर्विचाराचा आदेश देऊ शकते.