
शिवसेना मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी संतोष कनोजीया उैर्फ टल्ली आणि हेल्मेटधारी अमित जयकिशन सिंग उैर्फ पपलू या दोघांना अखेर ठाणे गुन्हे शाखेच्या एसआयटी पथकाने आज अटक केली. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील एका मंदिरातून त्यांना उचलले. या हत्येतील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांची हत्या करणारा आरोपी संतोष कनोजीया उैर्फ टल्ली आणि हेल्मेटधारी आरोपी सीसीटीक्हीमध्ये कैद
झालेले होते. हत्येच्या घटनेनंतर संतोष टल्ली हा सतत आपले लोकेशन बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याला प्रयागराजमधून बेडय़ा ठोकल्या. तर टल्लीसोबतच हत्येच्या दिकशी हेल्मेट घालून आलेल्या अमित सिंग उैर्फ ‘पपलू’ हा दुसरा आरोपीही त्याच्यासोबत होता. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे. पपलू हा मीरा-भायंदर परिसरातील रहिवासी आहे.




























































